Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मानसशास्त्राचा तास होता . एका शिक्षिकेने अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास हातात धरला आणि सर्व विद्यार्थ्यांवरएक नजर टाकली .
प्रत्येकाला वाटले की आता मॅडम विचारतील
की हा ग्लास भरलेला आहे की रिकामा ? पण एक स्मित हास्य करुन मॅडम ने प्रश्न केला, "या ग्लासचं वजन किती असेल कुणी सांगेल का ?"

कुणी म्हणालं 100 ग्रॅम तर कुणी 200 ग्रॅम . एक जण तर म्हणाला - मॅडम, अर्धा किलो !
मॅडम ने पुन्हा एकदा स्मित हास्य करुन बोलण्यास सुरुवात केली, " याचं वजन मोजमाप करुन सांगितल्याने फारसा फरक पडणार नाही !

मुळात वजन काहिही असो, जर का मी हा ग्लास
एक मिनीट असाच धरुन ठेवला तर मला काही त्रास होणार नाही . एक तास धरुन ठेवला तर हात दुखेल आणि दिवस भर असाच ठेवला तर ... ? तर हात खुप जड होईल, ईतका की बधीर होउन निकामीच ह्वावा .

आपल्या आयुष्यातील तणाव अन् चिंतांच पण असंच असतं .

क्षण भर विचार करा , काही वाटणार नाही . पण मनात धरुन बसाल तर ... तुमचं मन पण असंच जड होत होत बधिर होईल ! ईतकं की तुम्ही काही करुच शकणार नाहीत !
तेव्हा व्यर्थ चिंता करणं सोडा . मनाला हलकं करा, आणि निरंतर अल्हाद दायक जिवन
जगायला शिका ...

आयुष्य खुप सुंदर आहे !"

Popular Articles