Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

पंढरपुरच्या विठोबाचा महिमा अपरंपार आहे. लाखो भाविक आषाढी कार्तिकी पंढरपुरची वारी न चुकता करतात. अनेक वर्षाच्या या परंपरेनुसार चालत आलेल्या वारीला लाखो भाविक तन मन धन विसरून विट्ठलाच्या चरणी लीन होतात. चला आपणही विठोबाला नमन करत सर्व वारकर्‍यांची वारी सुखाची होवो अशी प्रार्थना करु!

सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥१॥
तुळसीहार गळा कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेची ध्यान ॥२॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥३॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । पाहिन श्रीमुख आवडेनी ॥

Popular Articles