Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

नशिबाची चाकरी करण्यापेक्षा,
कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगाव,
आयुष्य जास्त सुंदर बनत...

भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा,
वर्तमानातल चित्र पूर्ण कराव,
आयुष्य जास्त सुंदर वाटत...

कायमच मागण्या करण्यापेक्षा,
कधीतरी काहीतरी देऊन पहावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत...

हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा,
मित्राच्या खांद्यावर रडून पहावं,
आयुष्य नक्कीच सुंदर वाटत...

चारचौघात एकट बसण्यापेक्षा,
कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत...

आपल्याला कोण हवंय यापेक्षा,
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत...

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत,
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत,
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत....

आपला दिवस आनंदात जावो...
शुभ सकाळ...

Popular Articles