Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एका झाडा खाली पोपट वाघ आणि डुक्कर
राहत होते.. त्यांची खूप मैत्री होती, ते
एकमेका शिवाय राहू शकत नव्हते..

एके दिवशी वादळ आल, आणि त्या वादळामध्ये झाड कोसळून खाली पडले..
आणि या प्रसंगा मध्ये पोपट मरण पावले.

आपला मित्र मरण पावल्यामुळे वाघ आजारी पडला आणि त्या आजार त्याचा मृत्यू झाला.

आपले दोन्ही मित्र मरण पावल्यामुळे डुक्कर सुद्धा त्या परीस्तीतीत जिवंत राहू शकत नव्हता, आणि त्याने सुद्धा त्या ठिकाणी आपले प्राण सोडले...

खूप दिवसांनी ज्या ठिकाणी पोपट वाघ आणि डुक्कर मरण पावले होते त्या ठिकाणी एक 'मोहाचे' ( 'मव् ) 'झाड रुजू लागले...

पुढे मव्हाच्या झाडापासून मानवाने''दारू''  बनवली.
..
...
आणि म्हणूनच.
ज्या वेळी माणूस दारू पितो त्यावेळी पहिला त्याचा पोपट होतो.. आणि पोपटा सारखा बोलू
लागतो...

थोड्या वेळाने तो वाघ होतो.. आणि कुणालाही न
घाबरता तो वाट्टेल ते बोलू लागतो, कुणाचेच ऐकत नाही..
..
सर्वात शेवटी त्याचा डुक्कर होतो. आणि मग ज्या प्रमाणे डुक्कर लोळतो.. त्याच प्रमाणे तो रस्तावर, गटारात लोळतो....

मित्रा बरोबर शेअर नक्कि करा..!

Popular Articles