Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

तुला आठवतंय...?

तुला आठवतंय: 

१. तो दूरदर्शनचा गोल-गोल फिरत येणारा लोगो

२. दूरदर्शनचा तो पट्टया-पट्टयाचा स्क्रीनसेव्हर

३. मालगुडी डेज

४. देख भाई देख

५. रामायण

६. मिले सुर मेरा तुम्हारा

७. टर्निंग पॉइंट

८. भारत एक खोज

९. अलिफ लैला

१०. ब्योमकेश बक्षी

११. तहकीकात

१२. ही मॅन

१३. सलमा सुलताना - ती दुरदर्शनवरची न्युज रीडर

१४. विको टरमरिक, नहीं कौस्मेटीक.... विको टरमरिक आयुर्वेदिक क्रीम

१५. ट्वँ.........ग!

वाशिंग पाउडर निरमा.. वाशिंग पाउडर निरमा.
दुध सी सफेदी, निरमा से आयी...
रंगीन कपडेभी खिल-खिल जायें!

१६. आय ऐम कॉम्प्लॅन बौय [शाहिद कपुर] आणि आय ऐम कॉम्प्लॅन गर्ल [आयेशा टाकिया]

१७. "सुरभि" वाले रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ

१८. आणि त्यानंतरचे - "मुंगेरीलाल के हसिन सपने", करमचंद, विक्रम वेता़ळ आणि असे बरे........च!

८० आणि ९० सालचा काय काळ होता तो!

नो सिटबेल्टस् ... नो एअरबॅग्ज .... ट्रकच्या मागच्या 'फाळक्यात' बसणेही एक पर्वणी असायची!

लहाण मुलांच्या त्या रंगबिरंगी "बाबा-गाड्या" ... "टँपरप्रुफ बाॅटल टॉप्स" चा अता-पता ही नाही!

सायकलच्या मागच्या चाकाला कार्डबोर्डचा तुकडा लाऊन त्याचा फटरररररार - मोटार सायकल सारखा - आवाज करत तासन् तास फिरायचे.. त्या सायकलच्या शर्यती... नो सेप्टी हेल्मेट्स, नो क्नी / एल्बो पॅड !

तहान लागली की नळालाच तोंड लाऊन पाणी पिणे.. बॉटल्ड वौटर - एक रहस्यच होते!

ते पोष्टाची तिकीटं... काडीपेटीचे कव्हर्स आणि बरंच काही जमा करण्याचा आणि जोपासण्याचे छंद!

सुट्टीच्या दिवशी, दिवसभर उनाडक्या - खेळ.. मात्र अंधार व्हायच्या आत घरी, ब-याचदा अगदी जेवणाच्याच वेळी!

खेळाच्या नादात अनेकदा पडलेले दात, खरचटलेलेे हात - पाय ... मात्र कुणीही तक्रार करायची नाही!

मित्रांसोबत चालत शाळेत जाणं... मोबाईलशिवायही आम्ही एकमेकांना नेहमीच शोधुन काढत असू! कसं? काही माहित नाही..!
खाण्यात अगदी केक, ब्रेड, चॉकलेटस्, निंबुपाणी, साखरेचा तो आले-पाक... सगळं चालायचं... नो डायट - नथिंग!!

मित्रांना खेळायला बोलवाची ती ट्रीक - बेल न वाजवता अगदी चुपचाप मागच्या रस्त्याने जाणं...

बॅटच्या जागी ते लाकडी फळीचे क्रीकेट, त्या आट्या-पाट्या, सुरपारंब्या... डॉक्टर - डॉक्टर, लपाछपी ... असे किती तरी खेळ....

परीक्षेत नापास झालो तरी त्याच ग्रेडवर - वरच्या वर्गात ढकलला - अशी सोय..... नो नीड टु विजिट सायकॅट्रिस्ट, सायकोलोजिस्ट वा कौन्सेलर्स........ काय दिवस होते ते...!

स्वातंत्र्य, यश, अपयश , जबाबदा-या ... आणि या सर्वांसोबत एकमेकांबद्दल कमालीचा आदरही द्यायला अन् घ्यायलाही शिकलो..

तुम्ही ही याच 'कालखंडातील' आहात का? .. हो..! तर मग मित्रांनाही याचा उल्लेख करा.... काय सांगावे कदाचित हे वाचुन तुम्हाला - तुमचा अन् मित्रांचा थोडा स्ट्रेस कमी होईल... नाहीच झाला तर वाढणार नाही हे मात्र नक्की...

Popular Articles