Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

हि गटारी स्पेशल कविता आहे, माझा अनुभव नाही. कृपया हितचिंतकांनी कविता करमणूक समजून वाचावी. उगाच माझ्यावर संशय घेऊन सातारी प्रश्नांचा भडीमार करु नये.
...........................................................

केंव्हातरी पहाटे, झिंगून रात्र गेली !
संपूर्ण एक खंबा, रिचवून रात्र गेली !!धृ!!

मद्यात घातला मी, सोडा जरा जरासा !
त्या बुडबुड्यात मजला बुडवून रात्र गेली !!१!!

कळले मला न तेंव्हा, माझेच वागणेही !
सारीच काचपात्रे फोडून रात्र गेली !! २!!

सांगू तरी कसे मी, बील कालच्या नशेचे !
माझा खिसाच सारा उसवून रात्र गेली !! ३!!

गेले पळून कोठे, माझेच सोबती ते !
आवाज पोलीसांचे सुनवून रात्र गेली !!४!!

तुटल्या कधीच तेंव्हा, माझ्याच दंतपंग्ती !
रक्तात बत्तीशी हि भिजवून रात्र गेली !!५!!

अंगास गंध येतो, माझ्या नको नकोसा !
गटारीत शेवटी मज ढकलून रात्र गेली !! ७!!

केंव्हातरी पहाटे, झिंगून रात्र गेली !
संपूर्ण एक खंबा, रिचवून रात्र गेली !!धृ!!

Popular Articles