Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

आईची कास आटली मग चालू केली दूधाची बाटली...
शाळेत जाऊ लागलो चालू केली पाण्याची बाटली ...
माध्यमिक शिक्षण चालू केले हातात घेतली थंडयाची बाटली ....
उच्च शिक्षण चालू केले हातात घेतली बियर ची बाटली ...

ती चांगली वाटली पण त्याने तहान नाही भागली...
मग चालू केली इंग्लिश बाटली तीने खिशाची तिजोरी आटली...
मग सुरु केली देशी बाटली ती काय बरी नाय वाटली...
तेव्हा चालू केली गावटी बाटली ती ऐवढी चांगली वाटली...

ओव्हर लोड होऊन आतडी फाटली...
मग दवाखान्यात गेलो मग डॉक्टरांनी लावली सलाईनं ची बाटली...
पण त्या बाटली च काही चालेना शेवटी प्राणजोत मावळ ली बाँडी घरी आनली...
आणि आंघोळ घातली. मग अंगावर गुलाब पाणी आणि आतरची बाटली..

तिने हाऊस नाय फिटली...
चितेवर ठेवली मग राँकेल ची बाटली..
ती मग ओतली जिवाची हाऊस तिथेच मिटली...
मित्रांनो दारु पिवुन गटारात पडण्यापेक्षा, दुध पिवुन बलवान व्हा!

Popular Articles