Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एकदा जर्मन नेवी मध्ये एक कॅप्टन आपल्या जहाजावर फेरी मारत असतो एक सैनिक पळत येतो आणि म्हणतो "शत्रूचे एक जहाज आपल्या दिशेने येत आहे "

कॅप्टन : ओह , मग एक काम कर , आत जा आणि माझा लाल शर्ट घेऊन ये

सैनिक: ठीकेय
दोन जहाजांमध्ये तुफान लढाई होते आणि शेवटी जर्मन जिंकतात.

सैनिक : अभिनंदन सर , पण हा लाल शर्ट का घातला तुम्ही ?

कॅप्टन : जर मला गोळी लागली असती तर
माझे रक्त बघून माझ्या सैनिकांचा आत्मविश्वास नाहीसा झाला असता ,ते होऊ नये म्हणून.

भाग २
तेवढ्या एक सैनिक पळत येतो आणि म्हणतो "शत्रूची ५० जहाजे आपल्या दिशेने येत आहेत"

कॅप्टन : मग आता एक काम कर आत जा आणि माझी पिवळी प्यांट घेऊन ये!!!

Popular Articles