Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

|| अभंग ||

माऊलीच्या भेटीसाठी
कासावीस झाला जीव,
विठू नाम घेता घेता
जीवाचाच झाला शिव ||

पंढरीच्या वाटेवर
चिराचिरा पांडूरंग,
घळघळा डोळ्यातून
वाहे सावळा श्रीरंग ||

युगे युगे वाळवंटी
देव अनवानी उभा,
आवडीने न्हावू घाली
वैष्णवांच्या टाचाटिभा ||

चंद्रभागा वाळवंटी
भाविकांची दाटीवाटी,
माऊलीच्या पायांवर
तृप्त लेकरांची मिठी ||

Popular Articles