Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

गोष्ट छोटी पण डोंगरा एव्हढी !!

एका राजाने दोन गरुड आणले आणि त्यांना शिकवण्यासाठी माणूस ठेवला .

काही दिवस गेले . एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला, अगदी बघत रहावे असे. दुसरा मात्र उडेचना. राजा काळजीत पडला ,
अगदी सारखे दोन पक्षी एक भरारी घेतोय दुसरा थंड .

काय करावे.. काय करावे..???

राजाने दवंडी पिटली, गरुडला कोणी उडवून दाखवावे म्हणून.

दुसऱ्या दिवशी पहाटे राजा बागेत आला, बघतो तो दुसरा गरुड पहिल्या पेक्षाही उंच गेला होता आणि हवेत सुंदर संथ गिरक्या घेत होता .

राजाच्या आश्चर्यास पारावार उरला नाही. हे अजब घडले कसे आणि केले तरी कोणी !

एक सामान्यसा दिसणारा शेतकरी अदबीने पुढ्यात आला आणि म्हणाला "महाराज मी केले!"

राजा : अरे पण कसे ?

शेतकरी : मी फक्त तो गरुड ज्यावर बसला होता ती फांदी कापली, दुसऱ्या क्षणी तो आकाशात
झेपावला बाकी तुम्ही बघत आहातच.

तात्पर्य :

आपली फांदी कधीतरी सोडून बघा. सतत सुखद मर्यादित कवचांमध्ये स्वतःला गुरफटवून ठेवू नका.

कदाचित बाहेर अधिक सुंदर खुले समृद्ध आकाश तुमची वाट बघत असेल.

Popular Articles