Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

टी व्ही समोर बसून उगाच चँनेल चाळत होतो...

बायकोने विचारले- टी व्ही वर काय आहे ?
मी म्हणालो भरपूर धूळ!
.........आणि भांडण जोरात सुरु झालं !

लग्नाच्या वाढदिवस, गिफ्ट काय हवं ? विचारलं तेव्हां म्हणाली- "असं काहीतरी हवं की एक पासून शंभर पर्यंत तीन सेकंदात पळेल!"
मी वजन काटा दिला!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !

रविवारी फिरायला जाऊया का ?  विचारलं...
"मला महागड्या जागी घेऊन चला" म्हणाली
मी तिला पेट्रोलपंपावर नेलं !
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !

आरशात प्रतिबिंब पाहून काळजीत पडून म्हणाली- "काय मी भयंकर दिसतेय... ?
तुमचं मत काय आहे ? "
मी म्हणालो "तुझा चष्म्याचा नंबर.. परफेक्ट आहे..."
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !

मी विचारलं - "वाढदिवसाला कुठे जाऊ या ?"
ती म्हणाली "जेथे खूप दिवसात मी गेलेले नाही !"
मी तिला स्वयंपाक घरात नेलं!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं..

Popular Articles