Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

का कळेना, मावळतीच्या कातरवेळी
मन हे का कातर होई?

का कळेना, आठवणीत तुझ्या
मन हे का हळवे होई?

का कळेना, विसरण्याच्या बहाण्याने
तुझी सय का गडद होई?

का कळेना, तोडले तू पाश प्रेमाचे तरी
तुझ्या सईने मनास का वेदना होई?

Popular Articles