Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

पुणेरी ग्रुप अँडमीन च्या अटी....
1 ) आपला ग्रुप हा फक्त मनोरंजना साठी असुन खाजगी गोष्टी शेयर करु नये.
2) ग्रुप सकाळी नऊ वाजता सुरु होईल व संध्याकाळी सात वाजता बंद होईल.
3)ग्रुपचे सर्व हक्क अँडमीन कडे राखुन ठेवले असुन तक्रार चालणार नाही.
4) कोणतेही पोस्ट टाकण्याआधी ती पुर्वी टाकली नाही ना याची शहानीशा करुनच टाकावी.
5) अँडमीन ला उदरर्निवाहा साठी कामधंदा आहे.
6) दुपारी दोन ते पाच या वेळेत पोस्ट टाकु नयेत.
7) ग्रुप मधील सदस्यानी नातेवाईकांना ग्रुप मध्ये सामील करुन घेण्याची पीरपीर अँडमीन मागे लाउ नये.
8) व्हीडीओ सारख्या नेटखर्चिक गोष्टी सांभाळुन टाकाव्यात.
9) ग्रुप अँडमीन हा नोकर नसुन व्यवस्थापक आहे याची जाणीव असावी.
10) इतर सदस्याना सोसल इतकेच पोस्ट रोज शेयर करा.
11 ) पोस्ट शेयर करताना पुण्याशी संबधीत करावा इथे ईतर शहरांशी काही कुनाला पडली नाही.
12) तुमचे ज्ञान, तत्वज्ञान ईथे पाजळायची गरज नसुन ईथे प्रत्येकजण सुज्ञ आहे.
13) स्माईल्या फुकटच्या आहेत म्हणुन ढीगभर टाकु नये.
14 ) रोज सकाळी गुडमाँर्निग आणी गुडनाईट टाकुन आमच्या बँटऱ्या जाळु नका.
15 ) स्वताचे लेख, ललीत, कवीता टाकु नये.

Popular Articles