Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मिञांनो विधानसभेचे बिगुल वाजलय, उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालीये. कोणीतरी आमदार होणार आणि सरकार कोणाचे तरी येणार यात शंका नाही. कारण जनतेने ठरवलय या वेळेस कोणाला निवडून
द्यायचे.

माझी सर्व मिञांना एवढीच विनंती आहे, एका दिवसाच्या राजकारणासाठी आपली आयुष्यभराची मैञी तुटणार नाही याची दक्षता घ्या. जसे उमेदवार निवडणूकी पुरते एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करतात आणि निवडणुक झाली की परत
आपली मैञी जपता. तसेच आपणही त्यांच्या सारखेच वागावे असे मला वाटते.

आपण एखाद्या उमेदवारासाठी भावनेच्या ओघात आपले आयुष्यभराचे मैञीचे नाते, रक्ताचे नाते पण विसरतो आणि वैयक्तिक संबंध खराब करुन घेतो. त्या बदल्यात आपल्याला त्या उमेदवाराकडून क्षणिक
शाबासकी, कौतुकाची थाप मिळते आणि आपण खुष होतो.

त्या आनंदाच्या आणि भावनेच्या भरात माञ आपण हे विसरतो की..आपले जवळचे मिञ, नातेवाईक, पिढ्यांपिढ्यांचे संबंध दुरावताय. याची जाणीव निवडणुक झाल्याच्या काही दिवसांनंतर आपल्याला होते, पण ज्या उमेदवारासाठी आपण हे संबध खराब केलेले असता त्याला माञ याची जाणीव पण नसते, कारण त्याला त्याच्या पुढच्या निवडणुकीसाठी त्याच्याकरता संबंध खराब करणारा आपल्या सारखा नवीन कार्यकर्ता भेटलेला असतो आणि आपण माञ ते दुःख, तो रोष घेऊन आयुष्यभर स्वतःला कोसत राहतो. हा माझा स्वतःचा अनुभव.

म्हणून मिञांनो येणा-या निवडणूकीत तुम्ही सर्वांशी तुमचे मैञीपुर्ण संबंध जपून तुमच्या उमेदवाराचा प्रचार करावा, वैयक्तिक टिका टाळावी, आपापसात भांडणे होऊन त्याचा ञास सर्वसामान्य जनतेला होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि आपले आयुष्यभराचे
संबंध जपावे हीच अपेक्षा...!!

जास्त बोललो असेल तर क्षमा असावी.....
.......तुमचाच मिञ........

Popular Articles