Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सुंदर कथा ....

लग्नाच्या पहिल्या दिवशी नवरा-बायकोने पक्के ठरवून टाकले की कोणीही दरवाजा ठोठावला तरी दार उघडायचे नाही.

सर्वात प्रथम "नवरदेवाच्या" आई-बाबांनी दार ठोठावले, पण त्या दोघांचही ठरल्या प्रमाणे दार बंद राहिले.

काही वेळाने "नवरीच्या" आई-बाबांनी दार ठोठावले पण दार बंदच..!आत बायकोची घालमेल नव-याला जाणवली.!

पाणावलेल्या डोळ्यांनी तिने शेवटी दार उघडले आणि आई-बाबांना भेटलीच.

नव-याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.......!!!!

काही वर्षे गेली. त्यांना २ मुले झाली आणि तिसर्यांदा मुलगी झाली.

बापाने सर्वांना बोलावून मोठी पार्टी दिली. पार्टी संपल्यावर बायकोने विचारले, मुलांच्या जन्माच्या वेळी आपण ऐवढी मोठी पार्टी नाही केली मग मुलीसाठीच का ??

बापाने हसत हसत उत्तर दिले की, "ते एकच अपत्य असे आहे की, जे आपल्या साठी दार उघडेल……"

मुलगी वाचवा.. जग वाचवा..

Popular Articles