Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

प्रेमाचा अर्थ...

सकाळी डोळे उघडण्यपूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते, ते प्रेम आहे.

मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो, ते प्रेम आहे.

भांडून सुधा ज्याचा राग येत नाही, ते प्रेम आहे.

ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते, ते प्रेम आहे.

ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते, ते प्रेम आहे.

स्वताला कितीही त्रास झाला तरीही ज्याच्यासाठी ख़ुशी मागतो, ते प्रेम आहे.

ज्याला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही, ते प्रेम आहे.

कुटुंबाच्या फोटो मध्ये आई-बाबाच्या सोबत ज्याचा फोटो असावा असे आपल्याला वाटते, ते प्रेम आहे.

ज्याच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते, ते प्रेम आहे.

हे वाचताना प्रत्येक ओळीला ज्याची आठवण आली, ते प्रेम आहे.

Popular Articles