Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

कालचा दिवस मला खूप काही शिकवून गेला हे खरं, पण मी आज जे करेन त्यावर माझा उद्या आकाराला येईल,
हे मला समजलं आहे.  आजचा दिवस मी उमेदीने, हिमतीने, जिद्दीने आणि मनापासून जगेन. कारण हा दिवस माझ्या आयुष्यात पुन्हा कधी उगवणार नाही, हे मला ठाऊक आहे.

आजचा दिवस ही माझ्या आयुष्याने मला दिलेली शेवटची संधी असू शकेल. उद्याचा सुर्योदय मी पाहीनच याची काय खात्री?

आज मी हरणार नाही. मागे पाहाणार नाही, अश्रु ढाळणार नाही, एकही संधी हातची जाऊ देणार नाही. आज मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात मौल्यवान संपत्तीची उत्तम गुंतवणूक करीन. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पुर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडीन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

आज मी चिडणार नाही, वैतागणार नाही, धुसफुसणार नाही. मनावरचं निराशेचं मळभ हटवून आज मी प्रसन्न हसेन. आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन. आणि आकाशात नजर लावून तिथे चमकणारी माझ्या स्वप्नाची नक्षत्रं डोळे भरून पाहीन.

Popular Articles