Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सूर्य आहे साक्षीला त्या दिवशी संध्याकाळी सांबू चोंबाळे सौ. गुंडी सांबू चोंबाळेला घेऊन समुदावर फिरायला गेला. आणि मावळत्या सूर्याकडे पहात तिचा हात हातात घेतला.

सांबू : प्रिये, प्रियत्तमे... या मावळत्या सूर्याला साक्ष ठेऊन एक सांगशील?
गुंडी : विचारा ना, प्राणनाथा.
सांबू : बघ हा खर्र, खर्र सांगायचं..
गुंडी : तुम्ही प्राणही मागितले, तरी वो दर्द मे हसते हसते पी लूंगी.
सांबू : समजा, म्हणजे समजा मी जरा अचानक मेलो. तर तू पुन्हा लग्न करशील का?
गुंडी : छे, छे, छे... असं अभद्र बोलू तरी कसं शकता. प्राणप्रिय पतीराजा.
सांबू : ऐकून बरं वाटलं बघ. पण कधी कधी मला खूप टेन्शन येतं गं. समजा अशी वेळ आलीच. तर काय करशील तू माझ्या नंतर?
गुंडी : काळजी करू नका हो. अशी वेळ आलीच. तर माझी धाकटी बहीण आहे ना सुंदरा. तिच्यासोबत राहीन आयुष्यभर. पण गडे, तुम्ही काय कराल हो, माझं जर असं झालं तर?
सांबू : मीही तुला वचन देतो प्रिये, जर दुर्दैवाने तुझं असं काही झालं तर मीही असंच करेन...

Popular Articles