Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

लग्न लग्न म्हणजे काय असतं?...
आनंदाच उधाण असतं, जबाबदारीच भान असतं...
पापण्यात लपलेल्या तिच्या नजरेच त्याच्याकडे बघून लाजणं असतं ...

कपाळावरील कुंकवाला सौभाग्याचा मान असतो ....
सनईच्या मखमली सुरात विहिणीच्या रुसव्याचा वेगळाच नूर असतो....
पतीमागे पाऊल टाकण्याऱ्या मनात साहचर्याच सुंदर जीवन असतं ...
तिच्या केसात गजरा माळणारा त्याचा प्रेमळ हात असतो.. ...

रातराणीच्या दरवळणारया सुगंधात न्हायलेला श्रृंगार असतो ....
भरजरी शालूला मेंदीचा गंध व त्याच्या प्रेमाचा छंद असतो....
घराला घरपण आणि हवहवसं वाटणारे बंधन असतं .....

भरकटणाऱ्या मनाला सावरणारा हात असतो, देवघरातील स्निग्धतेचा साथ असतो ....
आई, वडील, भाऊ, बहिण या नात्यांचा पर्याय असतो, जीवनाचा रंगलेला सुंदर डाव असतो....

त्याच्या निष्काळजी स्वभावाला तिच्या जबाबदारीच कोंदण असतं आणि तिच्या खर्चाला त्याच्या खिशाच आंदण असतं .............
त्याच्या चुकांना तिचा पदर आणि तिच्या दु:खाला त्याचा खांदा असतो.....

तो चिडला तरी तिने शांत राहायचं असतं, कपातल्या वादळाला चहाबरोबरच संपवायचं असतं .....

लग्न लग्न म्हणजे काय असतं?...
आनंदाच उधाण असतं, जबाबदारीच भान असतं..

Popular Articles