Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर करावं,
प्रेमासाठि जगाव, प्रेमाखातर मरावं

त्याच्या एका हास्यावरती अवघं विश्व हरावं,
अन अश्रुच्या थेंबालाहि डोळ्यात स्वत:च्या घ्यावं.

दुखाची भागी होऊन सुख त्याच्यावर उधळावं,
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर करावं,

तु आणि मी हे व्याकरण प्रेमात कधीच नसावं,
आपलेपणाच्या भावनेतच सार मी पण सरावं.

एकमेकांच होऊन एकमेकांना जपावं,
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर करावं.

मधुर त्याच्या आठवणीमध्ये रात्र - रात्र जागावं,
अन चुकून मिटताच पापण्या स्वप्नात तयाने यावं.

बहरल्या रात्रीत चांदण्या त्याच्या विरहात झुरावं
पण खरच,
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर करावं,
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर करावं.

Popular Articles