Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

पुणेरी पाट्यांचा कहर !!!

एका गृहस्थाला सपाटून भूक लागली. म्हणून तो हॉटेल शोधत होता. तेवढ्यात त्याला पाटी दिसली. त्यावर लिहिलं होतं, 'जेवणाची उत्तम सोय'.

जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले.
एकावर लिहिलं होतं 'शाकाहारी' तर दुसरयावर 'मांसाहारी'.

तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.
आतमध्ये आणखी दोन हॉल होते. डावीकडे पाटी होती 'भारतीय बैठक' तर उजवीकडे 'डायनिंग टेबल'

तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला. आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते. एकावर पाटी होती 'रोख' तर दुसरी 'उधार'

तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला.

पुढे गेल्यावर वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली. तो अचंबीत झाला. त्याने मागे वळून पाहिले तर तिथे एक पाटी होती.

'फुकट्या, मागे वळून काय बघतोस? हा बाहेरचाच रस्ता आहे.'

Popular Articles