Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एक लोकांचा समूह चालत पर्यटनाला निघाला. वाटेत त्याना एक अंधारी बोगदा लागला. बोगद्यात काहीच दिसत नव्हते व लोकांच्या पायाला काही खडे टोचू लागले. काही लोकानी ते इतराना टोचू नये, ईजा होवू नये म्हणून उचलुन खिशात ठेवायला चालू केले.

काहीनी जास्त उचलले तर काहीनी कमी उचलले. काही लोकानी विचार केला, कशाला उचला? मला त्रास झालाच ना, तसा इतराना होईल. त्यामुळे काहीनी उचालेच नाहीत.

जेव्हा ते बोगद्याबाहेर आले व खिशातून टाकण्यासाठी खडे बाहेर काढले तर ते अस्सल हीरे होते. त्यावेळी कमी उचललेले लोक हळहळु लागले की जास्त उचलले असते तर हीरे जास्त मिळाले असते. न उचललेले लोक पश्चाताप करू लागले.

आपले जीवन पण या अंधारया बोगद्यासारखे असते व खड़े म्हणजे चांगुलपणा  किंवा सत्कर्म आहे. सत्कर्म हिऱ्यासारखे बहुमोल व किमती आहे.

सत्कर्म करत राहा!

Popular Articles