Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मुलगी :- काय रे, तुला साधा रिप्लाय पण करता आला नाही ना?

मुलगा :- सॉरी गं. कामात इतका अडकलेलो की मोबाइलकडे बघायलाच वेळ नाही मिळाला.

मुलगी :- खोटे बोलू नकोस! संध्याकाळी पण भेटला नाहीस. कालपासून उगाच कामाची कारणे. खरे सांग ना.. काय झालंय ? तुला कसले टेन्शन आहे का? तू काही लपवतो आहेस का? तू कधीच तुझे प्रॉब्लेम शेअर करत नाहीस. अरे बोलल्या शिवाय मोकळे कसे वाटेल? सांग ना.. आपण मिळून काहीतरी मार्ग काढू.. सांग ना.

मुलगा :- विंडोज बूट स्क्रीनलाच हॅंग होते आहे. सिस्टिम रिस्टोर पण फेल जाते आहे. जर समजा स्क्रीन पास झालेच तरी Boot mgr चा प्रॉब्लेम येतो आहे. बहुदा एकाचवेळी दोन हार्ड डिस्क जोडल्याने होत असेल. पण तशी पण एक सेकंडरीच आहे. समजत नाहीये पटकन असे का होते आहे ते.

मुलगी :- ऐक ना.. आई हाक मारतीये. मी तुला नंतर मेसेज करते. बाय...

Popular Articles