Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एकदा....

एकदा गावी जाण्यासाठी
एस टी मध्ये बसलो
सीटवरती बसताना
मनामधीच हसलो....

सीट होतं दोघांचं
एकटी होती लडकी
जवळ तिच्या बसलो की
दिल मे आग भडकी...

माझ्याकडे पाहून
ती गालात हसली
मला वाटलं नक्कीच
ती आता फसली...

रंगाने होती गोरी
चेहर्‍यावरती हसरे भाव
तिला पटवण्याचा माझ्या
मनाने केला उठाव...

एस टी थोडी आदळली की
तिचा स्पर्श व्हायचा
श्रावणातल्या सरींची
आठवण करून  द्यायचा...

बसण्यात थोडं अंतर होतं
ते पण आता सरलं
बघता बघता एसटी ला
अंधारानं घेरलं....

अंधाराचा फायदा घ्यावा
असं मला वाटलं
विचारांचं काहूर
मनात माझ्या पेटलं....

काय बोलावं तिच्याशी
काहीच कळत नव्हतं
मनात यायचं बोलावं
ओठांवरती वळत नव्हतं...

कुणी इकडं बघतं का
पहात होतो जवळपास
ती वाटायची पारो
मी तिचा देवदास...

मी मग ठरवलं
तिच्याशी आता बोलायचं
मनातलं प्रेम
तिच्यापाशी खोलायचं...

मी बोलणार इतक्यात
तिने काढला "खाऊ"
हळूच म्हणाली थोडासा
खाता का हो "भाऊ"?

त्याचदिवशी ठरवलं
"प्रत्येकीवर" नाही मरायचं
पहिलं प्रेम आता
"बायको" वरच करायचं...

Popular Articles