Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

हे साले मित्र सगळेच असेच असतात!
चिडवुन सतावुन जिव नकोसा करतात.. 
तरी ही नेहमी हवेसेच वाटतात.. 
लग्ना पुर्वी प्रियेसीला पाहुण आयटम सही म्हणुन चिडवतात, 
लग्ना नंतर तीलाच आदराने वहीनी असी हाक मारतात..
हे साले सगळे मित्र असेच असतात.. 
 
जेवताना एकमेकाच्या डब्ब्या वर सगळ्याची नजर असते, 
खास पदार्थ सर्वाना पुरेल याची मात्र खात्री नसते. 
पण एखाद्या दिवशी डबा नाही आनला तरी आपलेच ताट इतरा पेक्षा जास्त भरतात. 
हे साले मित्र सगळे असेच असतात.. 
 
नाक्या वर ही गप्पा मारताना तीन मे पाच बिस्कीट के लीये चहा ची ऑर्डर सुटते. 
बील भरण्याची वेळ आली की सर्वाचीच पान्गा-पान्ग होते. 
मात्र अचानक कधी बाबाला अँडमीट करावे लागते 
तेव्हा ढाम पणे म्हणतात आहोत आम्ही पाठीशी म्हणत अँडव्हास न कळत भरल्या जाते.. 
हे सालेमित्र सगळेच असेच असतात.. 
 
अवचीत एखादा प्रसंग ओढावला तर सख्खे नाते वाईक ही पाठ फिरवतात, 
अशा वेळी छळणारे हेच मित्र पाठीशी भक्कम पणे उभे असतात.. 
रक्ताच्या नात्या पेक्षा ही मैत्रीचे नाते श्रेष्ठ ठरवितात.. 
हे साले मित्र सगळेच असे असतात.. 
चिडुन सतावुन जीव नकोसा करतात तरी ही नेहमी हवेसे वाटतात!

Popular Articles