Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मी एक सुंदर लेख आपल्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून जिवनाचा खरा अर्थ सर्वांच्या लक्षात येईल....

एका माणसाचं निधन होतं. हे त्याच्या लक्षात येतं जेव्हा साक्षात भगवंत हातात एक गाठोड़ घेऊन त्याच्या समोर प्रगटतात.भगवंत आणि त्या माणसामधील संवाद...

भगवंत - वत्स, चल आधीच उशीर झालाय !

माणूस - पण देवा मला तर तुम्ही फार लवकर आणलंत. मला आणखी खुप काही करण्याची इच्छा आहे.

भगवंत - माफ कर, अगोदरच फार उशीर झाला आहे.

माणूस - पण भगवंता, ह्या गाठोडयात काय आहे ?

भगवंत - जे आहे ते तुझंच आहे !

माणूस - माझं म्हणजे माझ्या वस्तू, कपडे, पैसे?

भगवंत - ते काही नाही कारण त्या सर्व भुतलाशी संबंधित आहेत.

माणूस - माझ्या आठवणी ?

भगवंत -त्या काळाशी संबंधित आहेत.

माणूस - माझं कर्तुत्व?

भगवंत - नाही ते परिस्थितीशी संबंधित आहे.

माणूस - माझे मित्र आणि परिवार?

भगवंत - नाही वत्स, ते तर तुझ्या प्रवासातील सोबती होते.

माणूस - माझी पत्नी व मुलं?

भगवंत - ते तर तुझ्या ह्रदयात आहेत.

माणूस - मग माझं शरीर आहे का त्या गाठोडया मध्ये?

भगवंत - नाही, नाही ते तर राख झालं..

माणूस - मग नक्की माझा आत्मा असेल?

भगवंत - वत्सा तु परत चुकलास. तुझा आत्मा तर माझ्याशी संबंधित आहे.

माणसाच्या डोळ्यातून आता तर अश्रु ओघळतात.

त्याने भगवंताच्या हातातून ते गाठोडं घेतलं आणि मोठ्या आशेने उघडून बघितलं तर काय...

रिकाम होतं ते...

निराश होऊन डोळ्यातील अश्रु पुसत..

माणूस - म्हणजे माझं स्वत:चं काहीच नाही ?

भगवंत - अगदी बरोबर, तुझ्या मालकीच कधीच काही नव्हतं.

माणूस - मग त्या सगळ्याचा अर्थ काय?

जीवन हे क्षणभंगुर आहे..जगा..प्रेम करा..!

Popular Articles