Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

गणिती पत्र        
श्री.अ.ब.क.
मु.पो.कोनवाडी
ता.त्रिकोणपूरम्
जि.भूमितीनगर

प्रिय व्यास महाशय यांना जय गणित!
पत्रास कारण की, कालच वजाबाईचे पत्र आले. इकडे  वर्तुळाबाई खुशाल नाहीत त्यांचा आकार वाढतो आहे.

त्यांचे पति गोलकुमार वहीवरून पाय घसरून पडले.
साडेदोन दिवसापूर्वीच विषमभुज त्रिकोणाचे पणतूजावई लघुकोन येवून पसार झाले .

चौरसाकडून कळले की, वर्तुळाबाईची कन्या बिंदू ही रेषापंत याचा मुलगा किरण  याचे बरोबर बीजगणित देशात पळून गेली.

बरे असो डाॅ अष्टकोने यांची बहुभुजा फॅमिली बरी असेल, दंडगोल,शंकूबाई, समांतर,लंब,परिमीती, यांना गणिती छोट्या त्रिज्येला गोड गोड पापा.

कळावे तुमचा,
परिघचंद्र 

Popular Articles