Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

शाळा विरुद्ध काॅलेज

शाळा: म्हणजे गणवेश, नीटनेटकेपणा.
काॅलेज: म्हणजे कसाही अवतार आणि स्टाईल.

शाळा: पेन्सिल, रबर, शार्पनर, पेन, पट्टी.
काॅलेज: एक बॉलपेन तो पण मित्राकडून घेतलेला.

शाळा: वर्गात येण्याआधी "टीचर, मे आय कम इन..?" किंवा "टीचर, मी आत येवू का...?"
काॅलेज: वर्गाजवळ येणार, किती बसलेत ते बघणार आणि मोबाईल कानाला लावून परत जाणार.

शाळा: सर्व विषयांची पुस्तकं आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार...!
काॅलेज: मित्राला बोलणार "अरे यार एक पेज तर दे ना".

शाळा: पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार, काय स्कॉलर आहे हा यार.
काॅलेज: फ्रेंड्स बोलणार "काही येत नाही त्याला म्हणून निघालाय".

शाळा: उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते.
काॅलेज: उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे लागते.

शाळा: म्हणजे व्यवस्थित पाठांतर.
काॅलेज: म्हणजे नुसता रट्टा.

शाळा: म्हणजे मजा, मस्ती, धमाल.
काॅलेज: म्हणजे जस्ट चिल यार.

शाळा: यार, मला ती आवडते.
काॅलेज: सांभाळून बघ रे वहिनी आहे.

Popular Articles