Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

।। वाडा चिरेबंदी  ।।
मित्रांनो कदाचीत तुम्हाला माहित नसेल आपल्या पुण्यात १५० एकरात बांधलेला ब्रिटीशकालीन वाडा आहे. वाड्याचे बांधकाम अतिशय पक्के आहे,स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना . वाड्यात पुणे, महाराष्ट्र , भारत व परदेशातील ५००० मानसे अत्यंत गुण्यागोविंदाने रहातात. वाड्यात शेकडो खोल्या आहेत. हजारो वाँचमन आहेत. वाड्यातील सर्व कामे पुरूष मंडळीच करतात उदा जेवण तयार करने, साफसफाई , कपड़े धुणे . वाड्यात स्वयंपाक सर्वांसाठी एकच असतो. वाड्यात सर्व खेळाची मैदाने आहेत. एक दोन मंदिरे आहेत . वाड्यात धर्म, जात पात यांना बिल्कुल थारा नाही.

वाड्यात सर्व प्रकारचे शिक्षण व कला शिकवल्या जातात. वाड्यात रहाणारे सर्वजण अनेक बाबतीत माहिर आहेत . जे लोक वाड्यातुन शिकुन बाहेर पडले ते नगरसेवक, आमदार, खासदार , मंत्री , मुख्यमंत्री  झाले . काहीजण मोठे समाजसेवक तर काहीजण मोठे उद्योगपती झाले.

हा वाडा एक विद्यापीठ आहे . मला वाटते आपण सर्वांनी एक महीना वाड्यात राहुन शिक्षण घेतले पाहीजे. पुढील आयुष्यात कितीही संकटे आली तरी आपण त्याला खंबीरपणे तोंड देवु इतके ज़बरदस्त शिक्षण वाड्यात मिळेल. मग ठरल ना?...

आरे हो वाड्याचे नाव पत्ता सांगायचा विसरलोच.

चला घ्या लिहुन.
....
येरवडा मध्यवर्ती कारागृह, येरवडा , पुणे.६

Popular Articles