Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

"बाप कुणाचा मरु नये"

लहान असल्यापासुन आई मुलांना सांगत असते .......

इथे जाऊ नको- बाबा मारेल,
तिथे जाऊ नकोस -बाबा मारेल,
झाडावर चढू नको- बाबा मारेल,
नदीकडे जाऊ नको- बाबा मरेल,
शाळेत जा नाहीतर- बाबा मारेल,
अभ्यासाला बस नाही तर- बाबा मारेल,
हे करू नको बाबा मारेल ,
ते करू नको बाबा मारेल..

मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात,
बाबांच्या भयाने शाळेत जातात
बाबाने मारू नये म्हणून अभ्यास करतात
बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात..

हळू हळू मुलं बाबां कडे दुर्लक्ष करून
आई वरच प्रेम करू लागतात
मना मधून बाबांना करून टाकतात वजा
आईच्या चरणावर सर्वस्व अर्पण करतात
बाबां पासून चार हात लांबच राहतात
मुलं आईच गाणं गातात,
मुलं आई वर कविता लिहितात..

कोणतंच मुल बाबाला........
दुधा वरची साय म्हणत नाही,
लंगड्याचा पाय म्हणत नाही,
वासरांची गाय म्हणत नाही
बाबां साठी मुलाकडे शब्दच नसतात
मुलाच्या पायाला ठेच लागली
तरीही मुले "बापरे" म्हणत नाहीत
स्वामी तिन्ही जगाचा "बाबांविना" भिकारी होत नाही
साने गुरुजीनांही "श्यामचा बाप" दिसत नाही

आई घरात असली कि,
घर कस भरल्यासारखं वाटतं मुलांना
बाबा घरात असला कि मात्र स्मशान शांतता
शप्पथ सुद्धा आईचीच घेतात मुलं,
बाबा शप्पथेच्या ही लायकीचा नसतो
बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या व
आडनावाच्या मध्ये "नावापुरता"

मुलं विठोबाला माउली म्हणतात,
बाबासाहेबांना भिमाई म्हणतात
धरणीला माय म्हणतात
आणि देशाला माता म्हणतात
बाबा मात्र धरणीतून ,
देशातून आणि मुलांच्या मनातून
केव्हाच झालेला असतो हद्दपार.........

बाबा असतो कठोर, काळीज नसलेला,
निर्दयी, मारकुटा
बाबा असतो..
मुलांच्या स्वप्नात येणारा बागुल बुआ
बाबा म्हणजे केवळ पैसे कमवण्याचे यंत्र
तेवढं काम त्याने केलं कि त्याचं कर्तुत्व संपलं

असं असुनही बाबा मेल्यावर............
मुलांच्या छातीत धडकी का भरते?
का बरसतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस?
का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्यासारखं?
का वाटत मुलांना कि आपण बेवारस झाल्यासारखं?
का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर?का मुलं घाबरतात
बाबा मेल्यावर?

कथा-कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला
हा "पत्थरदिल" बाबा.........
प्रत्येक्षात जेव्हा नसलेला होतो,
तेव्हा का वाटतं मुलांना कि,

बाप कुणाचा मरू नये !
बाप कुणाचा मरू नये !
बाप कुणाचा मरू नये !

Popular Articles