Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

दहावीचा निकाल १७ जूनला:
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालान्त परीक्षेचा अर्थात, दहावीचा निकाल १७ जून रोजी वेबसाइटवरून जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थी वेबसाइटवर आपला निकाल पाहू शकतील. हा निकाल ' बेस्ट ऑफ फाइव्ह ' च्या सूत्रानुसारच लागणार आहे.
शुक्रवारी, १७ जूनला दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना वेबसाइटवरून आपला निकाल पाहता येईल.

त्याशिवाय, बीएसएनएलच्या मोबाइलवरूनही विद्यार्थ्यांना आपला रिझल्ट एसएमएसद्वारे मागवता येणार आहे. विद्यार्थ्यांनी MHSSC (space) Seat No. टाईप करून ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस केल्यास एक रुपयांत त्यांना आपला निकाल उपलब्ध होऊ शकेल.
सोमवारी, २७ जूनला दुपारी तीन वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना आपापल्या शाळांमध्ये मार्कशीट दिली जाणार आहे.

Popular Articles