Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

बुधवारी मंगळामुळे लग्ने तुटणार्या आणि अमावस्येला कामे टाळणार्या देशाचे " मंगलयान" 64 कोटी किलोमीटर प्रवास करून अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर मंगळावर उतरत आहे .
४५० कोटी रूपये इतक्या कमी खर्चातील आणि १००% भारतीय बनावटीचे हे यान आहे . हा प्रकल्प म्हणजे ISRO चे भारतावर उपकार आहेत , यश लाभले तर भारताला ३०० बिलीयन डॉलर्सची बाजारपेठ खुली होणार आहे .

जगभरातून मंगळासाठी राबविलेल्या 51 अवकाश मोहिमांपैकी 27 मोहिमा अपयशी ठरल्या आहेत. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि युरोपियन देशांनाच मंगळ मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण करता आल्या आहेत. भारत हा पहिला आशियाई देश.. तर पहिल्याच प्रयत्नात मंगळ गाठणारा जगातला पहिला देश ठरणार आहे.

ISRO संचालकांना तुमच्या करोडो शुभेच्छा पोहचुद्यात ज्यामुळे त्यांना हुरूप आणि यश येईल .

जय विज्ञान ....जय भारत. .....

Popular Articles