Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

हरवलेली आई

जाऊ नकोस न आई कामाला आज तरी
आजसुद्धा राहता नाही येणार का तुला घरी
मुठीतले इवलेसे बोट आर्जव करी भारी
आणि काळजाचा ठोका करी सतत वरखाली

नको खाऊ, नको खेळणी फक्त आजचा दिवस
तुझ्यासोबत घालवलेला वाटे मज स्वर्गापरी
कसे ग उमजत नाही हे तुजला
तुझा फक्त माझ्या सोबतच असणं आवडे मला

खरं सांग आठवतंय का तुला माझा पहिल पाऊल
धडपडलो होतो फार, तुझ्या काळजात उठल होता काहूर
नेहमीप्रमाणे होतीस ऑफिसात तू तेव्हा
जेव्हा माझ्या बोबड्या बोलांची लागली होती चाहूल

आई आनंद आनंद म्हणजे नेमका ग काय
तुझी वाट पाहत खिडकीत बसतो घालून पाय
सारखा सारखा पाहून तोच रस्ता केव्हाच झालाय पाठ
सोबती माझे काऊ चिऊ सारेच मिळून बघतोय वाट

बघ ना तुझ्या आठवणीने सारखा येतंय रडू
आजीच्या हाताचा गोड घास सुद्धा झालाय कडू
शूर आहे शिवबा तुझा नेहमीच नाही रडत मुळू मुळू
पण आठवणींचा उमाळा कधी येतो माझा मलाच नाही देत कळू

माहित आहे मला धडपडतेय माझी आई सतत
माझ्या साठीच करतेय हि तारेवरची कसरत
लपवतेस माझ्यासाठी तुझ्या पाणावलेल्या डोळ्यांना
बजावतेस परत वळून पाहणाऱ्या तुझ्या मनाला

सॉरी आई रडवायचं नव्हतं ग तुला
पण आज उगी उगी तुझा बाळ म्हणतंय ग स्वताला
रागावू नकोस, पण बघ माझ्या भविष्याच्या धडपडीत
माझी हरवलेली आई, पहा कुठे सापडतेय का तुला?

Popular Articles