Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

अशीच आवडलेली काही वाक्ये...

१. ''वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं
लागतं, आपण कितीही सरळ
असलो तरी वळणावरून वळवाच लागतं. ''

२. ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास
झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.
त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे
चांगलाच कळलाय ...

३. "चांगली वस्तु", "चांगली व्यक्ती", "चांगले
दिवस", यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर
समजते..."

४."आशा सोडायची नसते, निराश
कधी व्हायचं नसतं...!
अमृत मिळत नाही. म्हणून विष
कधी प्यायचं नसतं...!"

५. तुमचे डोळे चांगले असतील तर,
तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल...
पण जर,
तुमची जीभ गोड असेल तर, हे जग
तुमच्या प्रेमात पडेल...

६. "चांगली वस्तु", "चांगली माणसे", "चांगले
दिवस, आले कि माणसाने "जुने दिवस विसरू
नये".

७. पाणी धावतं. म्हणून त्याला मार्ग
सापडतो. त्याप्रमाणे, जो प्रयत्न
करतो त्याला यशाची, सुखाची,
आनंदाची वाट सापडते...

८. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात
आहे, कारण एकही दोष
नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर
आयुष्यभर एकटे राहाल...

९. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे
आठवण, कारण हि विसरता येत नाही अन
त्या व्यक्तीला परत हि देता येत नाही.

१०. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ
ठरवते...
आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे
मन ठरवते...
पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार
हे आपला "स्वभावाच" ठरवतो...

११. हे देवा, माझा तिरस्कार
करणाऱ्या लोकांना दीर्घायुष्य लाभू दे
आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू
दे...

१२. तिच्या डोळ्यांत पहिले तेव्हा समजले प्रेम
कशाला म्हणतात...आणि
ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम
कशाला म्हणतात...

१३. प्रेम म्हणजे... समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास
आहे.

Popular Articles