Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

निबंध 'नवरा'

'नवरा' हा घरगुती पाळीव प्राणी आहे. प्रत्येक घरात आढळून येतो. हा प्राणी पाळण्याचा पूर्ण अधिकार
"पत्नी" नावाच्या महीलेलाच असतो.

हा मनुष्याशी मिळता जुळता प्राणी आहे. तसे तो 'नवरा' होण्याच्या पूर्वी मनुष्य म्हणुनच गणला जातो. त्याला दोन डोळे असतात पण ते फक्त निमुटपणे पाहण्यासाठीच.

त्याला एक तोंड पण असते पण ते उघडायला पूर्णपणे बंदी असते.

त्याला दोन कान पण असतात ते फक्त बायकोचे बोलणे खाण्यासाठी व आदेश ऐकण्यासाठीच असतात.

त्याला एक नाकपण असते पण त्यात एक अदृश्य वेसण घातलेले असते.

नवर्याचे तीन प्रकार असतात ...

१) बायकोच्या हातचे बाहुले:

* ही जात आपल्या देशात मोठया प्रमाणात आढळते..
* ह्या जातीचे जातीचे नवरे टिकाऊ मेहनती सरळसाधे व इमानदार असतात.
* बायकोचे बोलणे,खवळणे, वसकणे, मारणे हे निमुटपणे सहन करतात...
* ह्या जातीचे नवरे पाळण्यास सर्वात चांगले असतात.

२) स्वताचे स्वातंत्र्य जपणारे नवरे:

* ही जात हळु हळु लुप्त होत चालली आहे..
* नेमके भारतात वाघ कमि राहीलेत कि हे नवरे याचा शोध घ्यावा लागेल.
* त्यामुळे सरकारने लवकरच एखादे अभियान चालवावे (व्याघ्र प्रकल्पा सारखे )
* सरकारने याना संरक्षण द्यावे ...
* सरकारने यांचा विलुप्त यादी मध्ये समावेश करावा..

३) पळपुटे नवरे:
* हे नवरे वरील दोन्ही प्रकारात मोडत नाहीत..
* हे बायकोच्या तावडीतुन असे काही पळतात कि "तु का पळालास तुला काय ञास आहे" हे विचारायला सुद्धा ते सापडत नाहीत ...
* कुंभ मेळ्यातील अर्धाच्यावर साधु हेच नवरे असावेत असा एक अंदाज आहे..
* हे सापडतच नसल्याने यांच्या बद्दल खुपच कमी माहीत उपलब्ध आहे....

Popular Articles