Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

"आज देवाला सुट्टी आहे
कृपया मंदिरात जाऊ नये,
देव खुप बिझी आहे
त्याला साकडं घालू नये।

जायचंच असेल तर जा एका अनाथाश्रमात,
तो तिथे लहान पोरांना हसवीत आहे,
तुम्हीही हसवा एखाद्या कोमेजलेल्या फुलाला
मंदिरातही जा, नका जा हवंतर
पण देवाला आज सुट्टी आहे।

तो भेटेल तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलात,
प्रेमाने रोग्याला बरा करताना
तुम्ही जा आणि हातभार लावा
मात्र आपली तक्रार सांगू नका
कारण आज देवालाही सुट्टी आहे।

तो दिसेल वृद्धाश्रमात आजी
आजोबांचे डोळे पुसताना,
रुमाल घेवून जा तुम्हीही अश्रु पुसण्यासाठी
मात्र आपले अश्रु दाखवु नका
कारण आज देवाला सुट्टी आहे।

तो बसला आहे ट्रॅफिक सिग्नल वर
खेळणी विकणा-या मुलांच्या सुरक्षेसाठी
तुम्ही जा.... हातात वह्या पुस्तके देऊन त्यांना सुशिक्षित करा
उगीच पाखंड पुराणासाठी मंदिरातही जा हवंतर
पण आज देवाला सुट्टी आहे।

तो बसला आहे अन्नाच्या कणात,
उगीच अन्न वाया घालू नका
जमेल तर एखादा घास द्या भुकेल्या माणसाला
तो आज त्यांच्यात रमला आहे ।

उगीच मंदिरात जाऊन देवाचा वेळ घालवू नका
त्याला भरपूर कामं आहेत,
जमलंच तर काही समाजकार्य करा
मंदिरातही जा हवंतर
पण आज देवाला सुट्टी आहे।"

- डॉ. विकास आमटे

Popular Articles