Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

आज सारे भारतीय नास्तिक हो झाले
झाले गेले पुन्हा सारे गंगेला मिळाले 

खेळच तो शेवटी कुणातरी हरायाचे 
ह्या वेड्या मनाला ते कसे उमजायाचे
कवी म्हणे स्वप्नाला हो नसते क्षितीज 
मन खाऊ पाही फळे पेरताच अवघे बीज 

आज सारे भारतीय नास्तिक हो झाले 
झाले गेले पुन्हा सारे गंगेला मिळाले 

आम्ही भारतीय; जणू एक धर्मच जाणतो 
साहेबाच्या खेळाला या जीवप्राण की मानतो
होता गडी एक बाद; हृदयात निखळे तारा
उरी दु:ख हो अफाट भावनांचा चढे पारा 

आज सारे भारतीय नास्तिक हो झाले 
झाले गेले पुन्हा सारे गंगेला मिळाले

वाहती अपेक्षांचे ओझे अकरा चिमुकले जीव 
जसा संताप ही येतो तशी येते हो त्यांची कीव
संघाचा-देशाचा कर्णधार; तो जणू शापित सम्राट
दिवे मालवता क्षणी त्याला नाही कोणाचीही साथ 

आज सारे भारतीय नास्तिक हो झाले 
झाले गेले पुन्हा सारे गंगेला मिळाले

पराभवाची काळरात्र जाईल उगवेल विजयाची पहाट 
विश्वचषक परत जिंकू आपण जर असेल तुमची हो साथ 
हा एकच देश जिथे येशू-अल्ला-राम देती आशीर्वाद एकत्र
चला मग पोहाचावूया संघाला आशाकिरणाचे हे पत्र

तर झाले गेले सगळे आता गंगेत सोडूया
पुन्हा एकदा आपण सर्व आस्तिक होवुया
पुन्हा एकदा आपण सर्व आस्तिक होवुया 
पुन्हा एकदा आपण सर्व आस्तिक होवुया

-- नीलयोग 

Popular Articles