Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एक छोटीशी मुलगी तिच्या बाबां बरोबर जात होती,
एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं.

बाबा: बाळा, घाबरू नको.. माझा हात पकड.

मुलगी: नाही बाबा, तुम्ही माझा हात पकडा.

बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक आहे बाळा?

मुलगी: जर मी तुमचा हात पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते. पण जर तुम्ही माझा हात पकडला, तर मला माहितीये की काहीही झालं तरी तुम्ही माझा हात कधीच
सोडणार नाही..!!

Popular Articles