Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

पण तुमी निवडून या भाऊ......

आम्हाला नको नळाला पाणी
आम्ही बोअरचे पाणी पिऊ
पण तुमी निवडून या भाऊ...

आम्हाला नको गुळगुळीत रस्ते
आम्ही खड्डयातून चालत जाऊ
पण तुमी निवडून या भाऊ...

अाम्हाला नको रस्त्यावर दिवे
आम्ही अंधारात वावरत राहू
पण तुमी निवडून या भाऊ...

आम्हाला नको थाेडीही करमाफी
आम्ही उपाशी राहू पण कर देवू
पण तुमी निवडून या भाऊ...

आम्हाला नको शहरात नदीनाले
आम्ही गटारांना वाहतांना पाहू
पण तुमी निवडून या भाऊ...

आम्हाला नको मोकळ मैदाने, जागा
आमची मुले टेरेसवर खेळण्या नेवू
पण तुमी निवडून या भाऊ...

आम्हाला नको सरकारी शाळा
तुमच्या संस्थेतून शिक्षण घेवू
पण तुमी निवडून या भाऊ...

आम्हाला नको तुमचा जाहिरनामा
आम्ही तुमच्या बोलण्यालाच भिऊ
पण तुमी निवडून या भाऊ...

आम्हाला नको मानधन व भत्ते
आम्ही घरचेच सदा जेवू
पण तुमी निवडून या भाऊ...

आम्हाला नको सरकारी दवाखाने
आम्ही महागडे उपचार घेवू
पण तुमी निवडून या भाऊ...

Popular Articles