Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सोमवारी रात्र:
बायको: आज तुम्ही पिऊन आलात ना?
नवरा: हो त्याच काय झालं फॉरेन क्लाएंटला कंपनी द्यावी लागते.

मंगळवारी रात्री:
बायको: आज परत पिऊन आलात ?
नवरा: अरे आज एका मित्राची एंगेजमेंट पार्टी म्हणून.....

बुधवारी रात्री:
बायको: आज पण तुम्ही पिऊन आला?
नवरा: अगं, आज एका मित्राचं ब्रेकअप झालं बिचार्‍याचं मन नाही दुखवू वाटलं !

गुरूवारी रात्री:
बायको: आज ही, आता आज आणखी कोणाचा ब्रेकअप झाला ?
नवरा : ब्रेकअप नाही, ऑफिसात कामाचा लोड फार होता.  डोकं फार भणभण करायला म्हणून.....

शुक्रवारी रात्री:
बायको: आज काय झालं ?
नवरा: अगं मंगळवारी ज्या मित्राची एंगेजमेंट झाली ना त्याचं आज लग्न होतं म्हणून आनंद साजरा केला.
कळलं ना?

शनिवारी रात्री:
बायको: हम्म.....आज ?
नवरा: आज जुने मित्र भेटले त्यांनी मला डिस्को मध्ये घेऊन गेले अन् फार जबरदस्ती केली. मी ही फार ना केली पण शेवटी घ्यावी लागली.

रविवारी रात्री :
बायको (रागात): आज काय झालं ?
नवरा (तेवढ्याच रागात): च्यायला, माणूस कधी स्वतःच्या मनाने नाही का पिऊ शकत?
...
....
तमाम पेताड मंडळींना समर्पित..

Popular Articles