Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

नशीब कसं असतं त्याचे एक उदाहरण....

रंगण्णा नावाचा एक अशिक्षीत गरीब माणूस एका देवळात घंटा वाजवण्याचं काम करत असतो..

तो ते काम अतिशय श्रद्धापूर्वक करत असे...आता तो
घंटेचा रंगण्णा या नावाने ओळखू जाऊ लागला...

कालांतराने या देवस्थानाचे महात्म्य वाढले...

बाहेरच्या प्रदेशातील लोक देवस्थानला भेट देण्यासाठी येऊ लागले...

तसेच विदेशी लोकही येऊ लागले...

देवस्थान कमिटी नव नविन सुधारणा करू लागले...

रंगण्णाला बोलवून कमिटीने सांगीतले की लवकरात लवकर इंग्लीश बोलणं शिकून घे...

मी निरक्षर मला कसे येणार इंग्लिश..? रंगण्णा वारंवार सांगु लागला.

परंतू कमिटीने सांगून टाकले की प्रत्येकाला इंग्लिश
आलचं पाहीजे...

रंगण्णांने खूप प्रयत्न केला. पण काही केल्या
त्याला इंग्लिश काही जमेना...

शेवची व्हायचं तेच झालं...त्याला कामावरून काढून टाकले...

बिचारा रंगण्णा त्याला काही सूचेना.. त्याचे डोके दुखु लागले म्हणून चहा प्यायला बाहेर पडला...

पण जवळपास चहा गाडा नव्हता...

अर्ध्या कि.मी. चालाव लागलं...परंतू जाताना त्याने पाहीले की इथे फक्त फूलांचे -फळांचे नारळाचे दुकान हाेते...

चहा साठी लोकांना खूप लांब पर्यंत चालत जावं लागत असे...

आता त्याने ठरवलं की आपण देवळाजवळ चहाचा गाडा सुरू करायचा...आणि दुसर्याच दिवशी त्यानी गाडा सूरु केला...

थोड्या दिवसाने त्याच्या पत्नीने पण नाष्टाचे पदार्थ करून गाड्यावर ठेऊ लागली...

कालांतराने छोट्या गाड्या वरून प्रशस्त हाेटेल झालं...

रंगाण्णा च्या मेहनतीने कालांतराने नंतर ३ स्टार हाँटेल झाले... कालांतराने ५ स्टार झालं...आता आजूबाजूला ४-५ हॉेटेल होते रंगण्णाचे...आता त्या राज्यात रंगण्णा सारखं हॉटेल कोणाचेच नव्हते...

एकदा दुसर्या राज्यातील शिष्ट मंडळ त्यांच्या कडे हॉटेल सूरू करण्यासाठी रंगण्णा बरोबर करार करण्यासाठी आले...

ठरल्या प्रमाणे करार झाला..करारावर सही करण्यासाठी कागदपत्रे रंगण्णाच्या पूढे ठेवले...
त्यावर रंगण्णा डाव्या हाताचा अंगठा पुढे केला...
आलेले सर्व अचंबित झाले...त्याचा प्रमुख म्हणाला...

५-५  5 STAR हॉटेलचा मालक साधा सही करण्या इतपत इंग्लिश येऊ नये..?

या वर रंगण्णा हसला व म्हणाला...इंग्लिश शिकलो असतो तर आज देवळात घंटा वाजवत बसलाे असतो..!!!

तात्पर्य:- यश मेहनतीने व जिद्दीने मिळते नुसत्या ज्ञानाने नाही.

Popular Articles