Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

बापाची चप्पल पायात येतीय, मग तु वयात चांगला आलाय
म्हणून लक्षण रेषा ओलंडण्यास, आता तू मोकळा झालाय
मीञांचा गोतावळा थोडा थोडा वाढत रहाणार
घराचा उंबराही हळूहळू तू सोडत जाणार

सिग्रेट देण्याघेण्यासाठी निवांत बसावं लागेल
आणि कधीतरी मित्राच्या आग्रहात फसावं लागेल
गंमत म्हणून धुरांच्या गाड्या हवेत सुटतील
हिंमत देत  मित्रही लाईटर वाले नवेच भेटतील

असंच कधीतरी हातात रंगीत ग्लास सुद्धा येतील
सुरुवात बीअरने करुन नंतर सल्ला दारूचा देतील
वास येत असेल तर नाक दाबुन पी
एकदम न घेता घोट घोट थांबून पी

कडवटपणा जाण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक टाकून पी
ठसका लागला तर थोडी थोडी वाकून पी
जास्तच चढल्यावर रात्री घरात उशीरा जा
कुणाला वास येवू नाही म्हणून पुदिना खा

मैत्रीचा दाखला देत तुला घरापर्यंत  सोडतील
तुझ्या साठी एखाद्याचं तंगडही मोडतील
दोन तिन वेळेस मित्रच आग्रहाने पाजतील
चौथ्या वेळेस मात्र तुलाच हक्काने मागतील

घराच्यांना कसं बनवायचं हे तर सहज शिकवतील
एखादी चोरलेली वस्तु बिन बोभाट लगेच विकवतील
मग प्रत्येक विकएन्डला ठरेल एकाएकाची पार्टी
पार्टीत आण म्हणतील एखादी कार्टी

पैसाचं कारण तू त्यांच्या पुढे मांडणार
ते सांगतील तस तू आईबापाला भांडणार
तुझी बनवेगीरी प्रेमाआड खरीच वाटून राहील
खरं कळल्यावर मात्र त्यांच काळीज फाटून जाईल

तोपर्यंत तुझं मन ठार मेलेले असणार
माणूसकी सोडण्याची सिमा पार केलेले असणार
खिसा गरंम असेपर्यंत मित्रांची साथ असेल
तुझा झरा आटल्यावर त्यांचीच लाथ बसेल

शेवटी एकटाच देशी नाहीतर  हातभट्टी पेशील
नातेवाईका बरोबर जगण्यालाही सोडचिट्टी देशील
मग मात्र आईबापच पुन्हा धावून येतील
किडण्या बदलण्यासाठी तुला घेऊन जातील

म्हणून पार्टीतील मित्रांची खबरदारी खरंच आतापासुन घे
मैत्री करण्यापुर्वी त्यांची कुंडली संपूर्ण तपासून घे
अरे आत्ताच कुठे तू अठरा वर्षाचा झालाय
८०% जीवन प्रवास अजून बेरजेचा राहिलाय...

Popular Articles