Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

"का लिहावे, कुणासाठी लिहावे, हेच आता कळत नाही,
शब्दांना पहिल्यासारखे आता धुमारे फुटत नाहीत !
दाभोलकर, पानसरे अशा विचारांवर हल्ला करणारे अजून मिळत नाही,

आम्ही डावे का उजवे, प्रतिगामी का पुरोगामी  हेच आम्हा उमजत नाही!

"ह्यांच्या" विरोधात "हे" निवडून यावे म्हणून मतदान का केले हेच आता कळत नाही,
माणूस म्हणून जगतो का 'आधार कार्ड' म्हणून जगतो हेच आता समजत नाही!

राजांचा महाराजा जो, त्याची शिव-जयंती नक्की कोणती कळत नाही,
टिळक, गांधी, फुले, आंबेडकर नक्की कोणाचे
हा गोंधळ सुटत नाही!

सात वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणारा कसा धजावतो, हेच कळत नाही,

एआयबीच्या कार्यक्रमात सोनाक्षी, दीपिका टाळ्या वाजवायला का कचरत नाही!

नक्की अपत्ये किती असावीत, ह्याचा तिढा अजून कोणालाच कसा सुटत नाही,

असलेल्या पाल्यांच्या, डोनेशन, प्रवेश परीक्षांचे अर्थकारण मात्र कसे कोणास उमजत नाही!

लोकांनी लोकांसाठी लोकांचे निवडले शासन म्हणजे काय साठ वर्षात कळले नाही,
स्विस बँकेतील श्रीमंत देशात शेतकरी आत्महत्या करतो हेच गणित सुटत नाही!

देवळाला सोन्याचा मुलामा देणाऱ्याना, दुधापासून वंचित ओठ कसे दिसत नाही,

नेते, अभिनेते, महाराज, बाबांच्या भाऊ-गर्दीत 'कॉमन man' मात्र सापडत नाही!

बाजूला एवढे चालू असताना आता मला गप्प बसवत नाही,
मनातील विद्रोह कागदावर आणायला तरी मन आता कचरत नाही!

Popular Articles