Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

खोटं वाटले  तर माफ करा...

आपण अशा देशात रहातो जिथे पोलीसाला बघून सुरक्षित वाटण्याच्या जागी जास्त भयभीत होतो...
खोटं  वाटले  तर माफ करा...

आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च करतो, त्याहून जास्त तिच्या लग्नात करतो...
खोटं वाटले तर माफ करा...

भारतीय लोक शर्मिले असून सुध्धा आपली लोकसंख्या १२१ कोटी आहे...
खोटं वाटले  तर माफ करा...

मोबाईल वर स्क्रेचेस् न पडण्यासाठी त्यावर स्क्रिन गार्ड लावतो पण मुलगा मोटरसायकलवर निघताना त्याला हेल्मेट घालत नाही...
खोटं वाटले  तर माफ करा...

सन्नी लीओन, पूनम पांडे ईत्यादी ईथे सेलिब्रीटी होवून जातात, पण परित्यक्ता, विधवा स्त्री समाज स्वीकारत नाही...
खोटं वाटले  तर माफ करा...

बेकार चित्रपटाची सिल्वर जूबिली साजरी होते, पण
प्रेरणादायी पुस्तके विकली जात नाही...
खोटं वाटले तर माफ करा...

ईथे प्रत्येकाला घाई आहे तरीही वेळेवर कोणीच का पोहचत नाही...
खोटं वाटले  तर माफ करा...

अस्स्सल मेरी कोम पेक्षा सिनेमात मेरी कोम चा रोल साकरणाऱ्या प्रियांकाला जास्त पैसे मिळतात...
खोटं वाटले तर माफ करा...

गीता आणी कुराण च्या नावावर भांडणे करणार्यांनी
ह्या ग्रंथाचे मूळात वाचन केलेलेच नसते...
खोटं  वाटले  तर माफ करा...

ईथे चप्पला वातानुकूलित दुकानात आणि भाजीपाला फूटपाथ वर विकला जातो...
खोटं वाटले  तर माफ करा...

देशासाठी जीवन समर्पित करणार्या सैनिकांच्या परिवाराला दोन लाख आणि क्रिकेट खेळणार्यास दोन करोड रुपये दिले जातात...
खोटं वाटले  तर माफ करा...

सगळ्यात महत्वाचे...या सगळ्या गोष्टी पटतात...
पण मनात आलेला बदलाव ३ ते ४ मिनिटा पेक्षा जास्त टिकतच नाही...
कारण माझा भारत महान...
आणि..
आम्ही भारतीय त्याहून अधिक महान...
खोटं वाटले  तर माफ करा...

Popular Articles