Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

भारतातील भयानक विरोधाभास. वाचा आणि पटलं तर बघा.

१) आम्ही मुलीच्या लग्नासाठी इतका खर्च करतो जितका तिच्या शिक्षणासाठी कधीच करत नाही..

२) आम्ही अशा देशात राहत आहोत जिथे पोलिसाला पाहिल्यावर आमच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होण्याऐवजी चिंता निर्माण होते.

३) IAS परीक्षेतील उमेदवार आपली बुद्धिमत्ता वापरून हुंडा पद्धत किती वाईट आहे यावर अतिशय छान निबंध लिहून लोकांना प्रभावित करतो आणि परीक्षा पासही होतो. आणि एक वर्षानंतर तोच उमेदवार वधूपित्याकडून एक करोड हुंड्याची मागणी करतो. कारण तो आता एक IAS ऑफिसर असतो.

४) भारतीय लोक खूप लाजाळू आहेत. तरीही भारताची लोकसंख्या १२१ कोटी आहे.

५) भारतीय लोक आपल्या मोबाईलच्या पडद्यावर स्क्रॅचेस पडू नयेत म्हणून आवर्जून त्यावर स्क्रीन गार्ड लावतात. परंतु गाडी चालवना हेल्मेट घालण्याची काळजी घेत नाहीत.

६) भारतीय समाज मुलींना बलात्कार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे शिकवतो. पण मुलांना बलात्कार करू नये हे शिकवत नाही.

७) इथे अतिशय टुकार सिनेमे सुद्धा अतिशय चांगला व्यवसाय करतात.

८) इथे पोर्नस्टार मुलीला एक सिलेब्रिटी म्हणून स्वीकारले जाते. पण बलात्कार झालेल्या मुलीला सामान्य माणूस म्हणूनही स्वीकारले जात नाही.

९) इथले राजकारणी आमच्यात फुट पडतात आणि अतिरेकी आमच्यात एकी निर्माण करतात.

१०) इथे प्रत्येकजण घाईत आहे. परंतु कुणीच वेळेत पोचत नाही.

११) पियंका चोप्रा ने मेरी कोमचे पात्र रंगवून जितका पैसा मिळाला तितका पैसा मेरी कोमला तिच्या संपूर्ण आयुष्यात मिळवता आला नाही.

१२) इथे अनोळखी व्यक्तीशी बोलणे धोकादायक मानले जाते. परंतु अनोळखी व्यक्तीशी लग्न करणे चालते.

१३) गीता आणि कुराण यांच्या नावावर भांडणाऱ्या लोकांपैकी ९९% लोकांनी ते वाचलेले नसते.

१४) इथे बूट आणि चपला वातानुकुलीत दुकानात विकल्या जातात आणि भाजीपाला रस्त्यावर विकला जातो.

Popular Articles