Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

गावातल्या आडावर ४ बायका पाणी भरत होत्या.
त्यातल्या एकीचा मुलगा तिथुन निघाला होता..

तर त्याला पाहुन ती म्हणाली..
तो बघा माझा मुलगा इंग्लिश मीडियम मला आहे.

पुन्हा दुसरीचा मुलगा तिथुन निघाला तर
त्याला पाहुन ती पण म्हणाली
तो बघा माझा मुलगा खाजगी शाळेत आहे.

त्यानंतर तिसरीचा मुलगा तिथुन निघाला
होता तर त्याला पाहुन त्याची आई म्हणाली
तो बघा माझा मुलगा, सीबीएसई ला आहे.

तेवढ्यात चौथीचा मुलगा तिथुन निघाला असता
त्याने आपल्या आईला पाहीले व जवळ आला, पाण्याची कळशी खांदयावर घेतली नि म्हणाला आई चल घरी...

त्याची आई म्हणाली जि. प. च्या शाळेत शिकत आहे.

आईच्या चेहर्यावरील आनंद पाहुन बाकी तिघिंच्या नजरा खाली गेल्या.
...
....
सांगायचं तात्पर्य एवढंच की लाखो रुपये खर्चून
देखील 'संस्कार' विकत घेता येत नाही..!

Popular Articles